इंदोरी येथे कालव्याचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:25 PM2019-06-16T13:25:37+5:302019-06-16T13:25:47+5:30
महत प्रयासाने अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पद्मावतीनगर (इंदोरी) येथे संतप्त कालवेग्रस्त शेतकरी आंदोलकांनी बंद पाडले.
अकोले : महत प्रयासाने अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पद्मावतीनगर (इंदोरी) येथे संतप्त कालवेग्रस्त शेतकरी आंदोलकांनी बंद पाडले. उभ्या पिकात बुलडोझर घालून पीक उद्ध्वस्त केल्याच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. सुमारे दीड तासाने आंदोलकांचा जोश मावळला आणि अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर साडेबारा वाजता काम पूर्ववत सुरू झाले.
शुक्रवारी धुमाळवाडीपर्यंत कालव्यांचे रेखांकन करण्यात आले होते. शनिवारी याभागात प्राथमिक पातळवरील कालवे खोदाईचे काम सुरू झाले होते. इंदोरी येथे कालवेग्रस्त कृती समितीच्यावतीने आबाजी चिमाजी धुमाळ, खंडू वाकचौरे, शंकरराव वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, भाऊसाहेब वाळुंज, संतोष तिकांडे, शिवाजी कोठवळ, सुनील धुमाळ, देविदास धुमाळ, नामदेव नवले, सचिन जोशी यांच्या नेतृत्वाखाली बुलडोझर पुढे बसत काम बंद आंदोलन केले. कालवे खोदाईचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. न्यायालयाचा अवमान होईल, असे अधिकारी समजून सांगत होते. कार्यकर्ते सुरुवातीला जोशात असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची विनंती धुडकावली.
पोलिसांनी आंदोलानातून उद्भवणाºया परिस्थितीची व कोर्ट कचेºयांच्या हेलपाट्यांची जाणीव करून दिली. तलाठी सचिन मांढरे यांनी महसूलकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. पण आंदोलकांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. पोलिसांची कुमक हळूहळू वाढली तशी आंदोलकांची तीव्रता कमी होत गेली. दरम्यान, शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत, सेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ व इतर कार्यकर्ते लग्नाच्या निमित्ताने इंदोरीकडे आले होते. त्यांनी अधिकारी व आंदोलकांशी चर्चा केली. निळवंडे कालव्याचे कार्यकरी अभियंता भरत शिंगाडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आंदोल-कांची समजूत काढली.