कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 23:12 IST2025-04-04T23:12:23+5:302025-04-04T23:12:37+5:30

शुक्रवारी रात्री जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तीन जणांना अटक केली आहे.

Canara Bank defrauded by depositing fake gold in bank; Four people including gold valuer booked | कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा

कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

जामखेड (जि. अहिल्यानगर) : कॅनरा बँकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बनावट सोन्याचे दागिने ठेवून १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तीन जणांना अटक केली आहे.

जामखेड पोलिसात आनंद बाबासाहेब डोळसे (वय-३० वर्षे, धंदा-नोकरी (कॅनरा बँक मॅनेजर, जामखेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बँकेच्या शाखेत ३ सप्टेंबर २०१८ पासून गोल्ड व्हॅल्युअर म्हणून आण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, बीड कॉर्नर जामखेड जि. अहिल्यानगर) कार्यरत आहेत. कॅनरा बँक जामखेड शाखेतील खातेदार मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी, जामखेड) यांनी दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेत येऊन सोन्याच्या ४ नग बांगड्या, ४ नग सोन्याच्या अंगठ्या, असे एकूण १०० ग्रॅम सोने असे एकूण ५ लाख, ८४ हजार ३७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून ४ लाख ५५ हजार रुपये मुनावर अजीम खान पठाण यांच्या कर्ज खाते बँकेने जमा केलेली रक्कम खातेदार यांनी काढून घेतलेली आहे.

दुसरे खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ जामखेड यांनी २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेत येऊन सोन्याच्या २ नग बांगड्या, ५ नग अंगठ्या, असे ८ लाख ६१ हजार ५५ रुपयांचे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून ६ लाख ७० हजार रुपये उचलले. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी बँक खातेदार दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड) याने २ नग बांगड्या, १ नग सोन्याचे कडे, १ नग ब्रेसलेट, २ नग सोन्याच्या अंगठ्या असे ८ लाख ५३ हजार रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँक शाखेतून ६ लाख ४८ हजार रुपये उचलले.

कॅनरा बँकेचे क्षेत्रीय कार्यालय नाशिक यांचे मार्फत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून जगन्नाथ रामदार सोनार यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची तपासणी केली. त्यावेळी सदरचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे, मुनावर पठाण, डिगांबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बँकेची १७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याने त्यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: Canara Bank defrauded by depositing fake gold in bank; Four people including gold valuer booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.