विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:07+5:302021-02-18T04:36:07+5:30
संघटनेचे मार्गदर्शक ॲड. गोपीनाथ घुले, प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहूल जऱ्हाड, संघटक हृषीकेश वाकचौरे, ...
संघटनेचे मार्गदर्शक ॲड. गोपीनाथ घुले, प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहूल जऱ्हाड, संघटक हृषीकेश वाकचौरे, उपाध्यक्ष सोमनाथ फापाळे, कार्यवाह हर्षल कोकणे, सचिव तृप्ती जोर्वेकर यांसह शुभम गोर्डे, साहिल जोर्वेकर, सागर गुंजाळ, सानिया शिंदे, साहिल जोर्वेकर आदी यात सहभागी झाले होते.
विनाअनुदानित तुकड्या व शिक्षक याबाबत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आजवर राज्यातील हजारो शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. २९ जानेवारीपासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. मात्र, सरकार याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही. विनाअनुदानित धोरण शासनाने रद्द करावे. शाळा, महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे. असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष घुले यांनी सांगितले. मागणीची सरकारने दखल न घेतल्यास संघटनेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण मेंगाळ यांनी स्वीकारले.
फोटो नेम : १७ छात्रभारती आंदोलन, संगमनेर ओळ : नायब तहसीलदार लक्ष्मण मेंगाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.