नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द; ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा संपुष्टात

By सुदाम देशमुख | Published: October 4, 2023 09:39 PM2023-10-04T21:39:00+5:302023-10-04T21:39:51+5:30

या कारवाईमुळे ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा संपुष्टात आली आहे.

cancellation of license of nagar urban bank | नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द; ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा संपुष्टात

नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द; ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे. बुधवारी (दि. ४) कामकाज संपल्यानंतर बँकेने कोणतेही काम करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बँकेवर अवसायक नियुक्त करण्याचा आदेश रिझर्व बँकेने सहकार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि केंद्रीय सहनिबंघकांना दिला आहे. या कारवाईमुळे ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा संपुष्टात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी हे आदेश बजावले आहेत. बँकिंग व्यवसाय करण्यासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बँकिंग नियमन कायदा १९४९ चे कलम ५६ सहल कलम ११ (१) आणि कलम २२ (३-ड) च्या तरतुदींचे पालन होत नाही. बँक चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांसाठी हितावह नाही. बँकेची सध्याची आर्थिक परिस्थितीमुळे ठेवीदारांच्या ठेवी देता येत नाहीत. तसेच बँकेला व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल, असे रिझर्व बँकेने आदेशात म्हटले आहे.

Web Title: cancellation of license of nagar urban bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.