आमदार मोनिका राजळेंसाठी कार्यकर्त्यांनी काढली उमेद दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 07:37 PM2017-11-21T19:37:30+5:302017-11-21T19:46:08+5:30
माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे.
कोरडगाव (ता. पाथर्डी) : माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे.
सहभागी व्हावे यासाठी पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध संस्थांच्या वतीने काढण्यात येणा-या उमेद दिंडीचा शुभारंभ तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता तारकेश्वर गडावर झाला. यावेळी महंतांनी उमेद कार्ड मोनिका राजळे यांना पाठवले आहे. यावेळी पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, पं.स. उपसभापती विष्णूपंत अकोलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, पं.स. सदस्य सुनील ओव्हळ, गोकुळ दौंड, एकनाथ आटकर, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष विजयकुमार मंडलेचा, अजिनाथ खेडकर, शिवाजीराव माहिते, बाळासाहेब गोल्हार, नगरसेवक नामदेव लबडे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आठरे, पं.स. सदस्य सुनील परदेशी, रवींद्र्र वायकर, खरेदी विक्रीचे संघाचे उपाध्यक्ष उत्तमराव गर्जे, रमेश घुले, मोहाज देवढेचे सरपंच गणेश चितळकर, अकोलेचे उपसरपंच नारायण पालवे उपस्थित होते.
दिंडी आठवडे बाजार, मोठ्या गावांमधून फिरणार
उमेद दिंडी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील आठवडे बाजार व मोठ्या गावांमध्ये फिरणार आहे. दिंडी समवेत असलेल्या एकावन्न हजार उमेद पोष्ट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या पोष्ट कार्डवर मोनिका राजळे यांना राजकीय बळ देणारे संदेश लिहून ते कार्ड पोष्टाद्वारे पाठवावेत, असे आवाहन माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर यांनी केले. उमेद दिंडीच्या फ्लेक्सवर मोनिका राजळे व पंकजा मुंडे यांचे छायाचित्र आहे. पं.स.सदस्य सुभाष केकाण यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.