अकोलेत आरक्षित जागेवर मिळेना उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:47+5:302021-01-09T04:16:47+5:30

अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तालुक्यातील ९५ गावे पेसाक्षेत्रात तर १२७ गावे आदिवासीक्षेत्रात गणली जातात. प्रत्येक गावात ...

Candidates not available for reserved seats in Akole | अकोलेत आरक्षित जागेवर मिळेना उमेदवार

अकोलेत आरक्षित जागेवर मिळेना उमेदवार

अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तालुक्यातील ९५ गावे पेसाक्षेत्रात तर १२७ गावे आदिवासीक्षेत्रात गणली जातात. प्रत्येक गावात किमान चार-दोन आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. तरीदेखील जातीच्या दाखल्याअभावी जागा रिक्त राहतात. ओबीसी प्रवर्गाच्या राखीव जागांवर ''कुणबी'' दाखला मिळवणाऱ्यांची ''कमांड'' दिसत आहे. घोडसरवाडी येथे सहा, शेरणखेल-चैतन्यपूर-जाचकवाडी-कळंब प्रत्येकी एक व भोळेवाडी येथे तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. परिणामी घोडसरवाडीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. औरंगपूर येथे ७ जागा आहेत. त्यापैकी ६ बिनविरोध, १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसल्याने या प्रवर्गातील एका महिलेने थेट अनारक्षित जागेवरून उभे राहून गावकऱ्यांना निवडणूक घेणे भाग पाडले आहे. परखतपूर गावात ६ जागा बिनविरोध तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. नाचनठाव गावात ६ जागा बिनविरोध तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.

बदगी गावात ५ बिनविरोध तर २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. सुगाव खुर्द गावात ३ बिनविरोध तर ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. रुंभोडी गावात ८ जागा बिनविरोध तर ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. इंदोरी गावात ६ जागा बिनविरोध तर ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. नवलेवाडी गावात ७ जागा बिनविरोध तर ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. पिंपळगाव निपाणी गावात ६ जागा बिनविरोध, ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. मन्याळे गावात ४ जागा बिनविरोध तर एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात असून २ जागा रिक्त आहेत.

Web Title: Candidates not available for reserved seats in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.