शेतात सापडला गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:59+5:302021-04-05T04:18:59+5:30
पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब दगडू थोरात यांच्या गट नं.२२४\१ शेतात मोसंबीच्या बागेत व उसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची ...
पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब दगडू थोरात यांच्या गट नं.२२४\१ शेतात मोसंबीच्या बागेत व उसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची झाडे असल्याची गुप्त खबर राहुरी पोलिसांना मिळाली. खबर मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलीस फौजफाट्यासह नायब तहसीलदार आण्णासाहेब डमाळे व महसूल पथकासह घटनास्थळी छापा टाकला . थोरात यांच्या शेतात ओली गांज्याची झाडे आढळून आली. पोलिसांनी १५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख ५४ हजार ७० रुपये किमतीचा ओला गांजा हस्तगत केला. पोलीस उपनिरीक्षक निरज बेकील यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेतमजूर बाजीराव रभाजी खेमनर (वय ७०) व शेतकरी बाळासाहेब दगडू थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेतमजूर बाजीराव खेमनर यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत आहे.
पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, निरज बेकील आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.