संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:23 PM2019-08-03T13:23:05+5:302019-08-03T13:23:30+5:30
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शिदायकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास घडली.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शिदायकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास घडली.
घारगाव येथील शिदायकवाडी शिवारात गंगाराम तान्हाजी आहेर या शेतक-याच्या राहत्या घरालगत असलेल्या गोठ्यात दबा धरलेल्या बिबट्याने शनिवारी सकाळी प्रवेश करत कालवडीवर हल्ला केला. त्यांनी नेहमीप्रमाणे काल गायी गोठ्यात बांधल्या होत्या. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना गाईंचा मोठा आवाज आला असता, ते गोठ्यापाशी गेले. यावेळी बिबट्याने एका कालवडीला मानेवर हल्ला करून जागेवरच ठार मारल्याचे त्यांना दिसले. वनपाल आर.के.थेटे, वनरक्षक एस.बी.धानापुणे, दिलीप बहिरट, दीपक वायळ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. शुक्रवारी (दि.२६) खोबरेवाडी व कडाळेवस्ती येथे बिबट्याने एक बकरू, शेळी व वीस कोंबड्यांचा फडशा पाडला होता.