कर्डिलेंच्या होमपीचवर गाडेंची बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:44+5:302021-01-13T04:50:44+5:30

अहमदनगर : माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, ...

Car batting on Cordile's home pitch | कर्डिलेंच्या होमपीचवर गाडेंची बॅटिंग

कर्डिलेंच्या होमपीचवर गाडेंची बॅटिंग

अहमदनगर : माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी प्रचारात उडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी गाडे यांनी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका केली.

बुऱ्हाणनगर येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ राहुरीच्या माजी नगरध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी राहुरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, आप्पासाहेब कर्डिले, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, अमोल येवले, संग्राम शेळके, सागर गायकवाड, विशाल वालकर, अमोल जाधव, रोहिदास कर्डिले, देवीदास कर्डिले उपस्थित होते. गाडे म्हणाले, तीस वर्षांनंतर बुऱ्हाणनगर येथे ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. मात्र, बु्ऱ्हाणनगर येथील लोकप्रतिनिधीला हे मान्य नाही. कर्डिले यांच्याकडून हुकूमशाही पद्धतीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप गाडे यांनी केला.

............

मतदारांनी त्यांच्या तोडचे पाणी पळवावे

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून रोहिदास कर्डीले व त्याची पत्नी असे दोघांचे अर्ज बाद करण्यास भाग पाडले. मात्र, न्यायालयात अपील केल्यामुळे दोघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. लोकांचे पाणी पळविणाऱ्यांच्या तोंडचे पाणी या निवडणुकीत मतदारांनी पळवावे, असे आवाहन गाडे यांनी केले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत नगर तालुक्यातील ५६ पैकी ५० ग्रामपंचायती ताब्यात घेणार असल्याचे गाडे म्हणाले.

Web Title: Car batting on Cordile's home pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.