दरीत कार उलटली, तिघे बचावले, नाशिक-पुणे महामार्गावरील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:30 PM2021-03-07T13:30:51+5:302021-03-07T13:31:24+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजलेच्या सुमारास घडली.

Car overturns in valley, three rescued, incident on Nashik-Pune highway | दरीत कार उलटली, तिघे बचावले, नाशिक-पुणे महामार्गावरील घटना 

दरीत कार उलटली, तिघे बचावले, नाशिक-पुणे महामार्गावरील घटना 

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजलेच्या सुमारास घडली.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील मितेश कथेरिया (वय ३५), भार्गव रामोलिया (वय २५, रा. सुरत), स्नेहल पोकीया (रा.भारुच, वय ३०) हे तिघे जण कारने (क्रमांक जी.जे.१६, सी.जी.७३३६) देवदर्शनासाठी नाशिक-पुणे महामार्गाने भीमाशंकरला निघाले होते.

रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हे तरूण माहुली घाटातून जात असताना चालक मितेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोल दरीत कोसळली. कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने तिघेही तरूण बचावले. ते किरकोळ जखमी झाले.

   कार उलटल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस अरविंद गिरी, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनद्वारे कार दरीतून वर काढण्यात आली.

Web Title: Car overturns in valley, three rescued, incident on Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.