कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:31 AM2021-01-10T11:31:03+5:302021-01-10T11:33:15+5:30

गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Car sinks on Kotul bridge; Car driver killed, two rescued | कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी, दोघे बचावले

कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी, दोघे बचावले

कोतूळ : गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

   कोतूळ येथील पूल पिंपळगाव खांड धरण पाण्यात बुडाला आहे. शनिवारी रात्री पुणे येथील एम.टी.यू.कंपनीचे मालक गुरू सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजुरकर गाडी चालक सतिश घुले (वय ३५, औरंगाबाद ) आपल्या इंडीव्हो फोर्ड या कारने कळसुबाईकडे निघाले होते. मात्र कोतूळात आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ- राजूर-कळसुबाई असा राज्यमार्गाचा रस्ता असताना ' गुगल मॅपवर ' कोतूळ -अकोले असे दाखवल्याप्रमाणे हे लोक रात्री पावणे दोन वाजता कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले. पावसाने रस्ता ओला असल्याने त्यात समोर पूल पाण्याखाली असल्याचा कोणताही फलक नसल्याने ते सरळ पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात गेले. मात्र खिडकीतून तिघेही बाहेर आले. दोघे कसेबसे पोहत कडेला आले. चालक सतिश घुले याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. रात्री दोन वाजता शोधकार्य सुरू केले होते.

संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, अकोले पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Car sinks on Kotul bridge; Car driver killed, two rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.