आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शेंडी गावाच्या सरपंचाविरोधात गुन्हा 

By अण्णा नवथर | Published: November 19, 2023 04:01 PM2023-11-19T16:01:35+5:302023-11-19T16:01:49+5:30

नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case against sarpanch of shendi village for posting objectionable content | आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शेंडी गावाच्या सरपंचाविरोधात गुन्हा 

आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शेंडी गावाच्या सरपंचाविरोधात गुन्हा 

अण्णा नवथर, अहमदनगर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: सोशल मिडियावर अक्षपेहार्यत पोस्ट केल्याप्रकरणी नगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी ( ता. नगर ) गावच्या महिला सरपंचाविरोधात नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रयागा प्रकाश लोंढे  ( रा. शेंडी, ता. नगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे.

याबाबत सिताराम आसाराम दाणी ( रा. शेंडी, ता. नगर ) यांनी फिर्याद दिली आहे. गावातील तरुणांचा शेंडी वार्ता नावाचा व्हॉटसअप ग्रुप आहे. या ग्रुपवर अक्षय भगत यांनी पोस्ट केली होती. त्यावर शनिवारी (दि. १८) सायंकाळी शेंडी गावच्या महिला सरपंच यांनी अक्षेपहार्य कमेंन्ट केली. त्यामुळे समजाच्या भावना दुखावल्या. तसेच दोन समाजात तेढ निर्माण हाेईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: case against sarpanch of shendi village for posting objectionable content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.