बेलापुरातील व्यापाऱ्यांवर दाखल गुन्हा खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:26 AM2021-09-17T04:26:11+5:302021-09-17T04:26:11+5:30
जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्ढा, किराणा मर्चंटचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, माजी सरपंच भरत ...
जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्ढा, किराणा मर्चंटचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, माजी सरपंच भरत साळुंके, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अजय डाकले, जनता आघाडीचे अध्यक्ष रवी खटोड, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव शरद सोमाणी, अशोक पवार, अनिल नाईक, लोहन दरक, प्रशांत बिहाणी यावेळी उपस्थित होते. उपअधीक्षक मिटके यांनी याप्रकरणी तपासात पुरावे आढळ्यास कारवाई केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले.
बेलापूर येथे खटोड यांच्या जागेमध्ये खोदकाम करताना गुप्तधन मिळून आले होते. याबाबत कुठेही वाच्यता करू नये याकरिता राजेश खटोड व हनुमंत खटोड यांनी आपल्या पतीला ११ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील एक लाख २८ हजार रुपये रोख दिले. मात्र, त्यानंतर पैसे देण्याऐवजी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातून पती सुनील यांनी घरात १२ सप्टेंबरला आत्महत्या केल्याची फिर्याद वंदना गायकवाड यांनी दिली. त्यावरून खटोड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थांचा दाखल झालेल्या गुन्ह्यावर आक्षेप आहे. मयत सुनील गायकवाड याने काही महिन्यांपूर्वी खटोड यांच्याकडे झाडे लावण्यासाठी खोदकाम केले होते. त्यावेळी गुप्तधन आढळून आले होते. याबाबत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून खटोड बंधू यांनी हे गुप्तधन सरकार जमा केलेले आहे. मयत गायकवाड यांनी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र दिले. त्यात आपली खटोड यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येशी खटोड बंधू व गुप्तधनाचा कोणताही संबंध नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
---------