कोपरगावात विनाकारण फिरणा-या चौघांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 03:38 PM2020-07-15T15:38:51+5:302020-07-15T15:39:32+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. कोपरगाव शहरातील विनामास्क विनाकारण फिरणा-या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

A case has been registered against four persons for wandering in Kopargaon without any reason | कोपरगावात विनाकारण फिरणा-या चौघांवर गुन्हा दाखल 

कोपरगावात विनाकारण फिरणा-या चौघांवर गुन्हा दाखल 

कोपरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. कोपरगाव शहरातील विनामास्क विनाकारण फिरणा-या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील माधवबाग परिसरात तोंडाला मास्क न लावता दाटीवाटी करून चौघे दुचाकीवरून विनाकारण फिरत होते. त्यांच्यावर पोलिसांनी मंगळवारी ( दि.१४ जुलै) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. 

श्रीकांत मच्छिंद्र लकारे ( वय २४ ), अक्षय संतोष जाधव ( वय २२), विकी नारायण पंडोरे ( वय २२ ), विनोद सुनील इमाले ( वय २१, चौघे रा. कहारगल्ली, कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. दरम्यान त्याच्याकडील दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. 

Web Title: A case has been registered against four persons for wandering in Kopargaon without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.