गैरमार्गाने संपत्ती जमविल्याने पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याच्यासह त्याच्या पत्नी वर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:57 PM2020-05-14T12:57:31+5:302020-05-14T13:06:40+5:30

अहमदनगर: पंचायत समिती सदस्य व मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास लिंबाजी खेडकर याच्यासह त्याची पत्नी सविता खेडकर यांच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अपसंपदा प्रकरणी (गैर मार्गाने संपत्ती जमविणे) गुरुवारी (दि.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक श्याम पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

A case has been registered against Panchayat Samiti member Devidas Khedkar and his wife for amassing wealth through illegal means | गैरमार्गाने संपत्ती जमविल्याने पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याच्यासह त्याच्या पत्नी वर गुन्हा दाखल

गैरमार्गाने संपत्ती जमविल्याने पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याच्यासह त्याच्या पत्नी वर गुन्हा दाखल

अहमदनगर: पंचायत समिती सदस्य व मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास लिंबाजी खेडकर याच्यासह त्याची पत्नी सविता खेडकर यांच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अपसंपदा प्रकरणी (गैर मार्गाने संपत्ती जमविणे) गुरुवारी (दि.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक श्याम पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. देविदास खेडकर हा पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी या ग्रामपंचायतीचा सदस्य व सरपंच असताना तसेच पाथर्डी पंचायत समितीचा सदस्य असताना त्याने त्याच्या ज्ञात उत्पादनापेक्षा जास्त मालमत्ता संपादित केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला. नोव्हेंबर 2001 ते 2018 या कालावधीत देविदास खेडकर याने कायदेशीर उत्पादनातून मिळवलेली एकूण मालमत्ता व त्या कालावधीत त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांचा एकूण उत्पन्नाचा खर्च याचा तौलनिक अभ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला. यामध्ये असे समोर आले की 2011 या वर्षामध्ये खेडकर याने त्याच्या एकूण उत्पन्नाच्या तब्बल 119 टक्के 12 लाख 5 हजार 445 इतकी जास्त अपसंपदा संपादित केली असल्याचे समोर आले. देविदास खेडकर याला अपसंपदा संपादित करण्यास कामी प्रोत्साहन दिले म्हणून त्याची पत्नी सविता खेडकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against Panchayat Samiti member Devidas Khedkar and his wife for amassing wealth through illegal means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.