बाळ बोठे याला पकडा अन्यथा उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:45+5:302021-02-16T04:21:45+5:30
या निवेदनात म्हटले आहे की, रेखा जरे यांची हत्या होऊन ७५ दिवस उलटून गेले तरी फरार बोठे पोलिसांना सापडलेला ...
या निवेदनात म्हटले आहे की, रेखा जरे यांची हत्या होऊन ७५ दिवस उलटून गेले तरी फरार बोठे पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलसीबीचे पोलीस अधिकारी एखाद्या सराईत गुन्हेगाराला सहज अटक करतात. त्यांना मात्र बोठे कसा सापडेना. यासंदर्भात पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले आहे. मात्र, काहीच उपयोग होताना दिसत नाही. बोठे हा त्याच्या यंत्रणेमार्फत जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात वकीलपत्रांवर स्वाक्षऱ्या पाठवित आहे. यावरून बोठे याची सर्व यंत्रणा काम करत असताना पोलीस यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. या गुन्ह्याची सीआयडीमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे का, असा सवाल उपस्थित करत बोठे याला अटक होत नसेल तर मला व माझ्या कुटुंबियांना उपोषण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात रुणाल जरे यांनी केली आहे.
जरे यांनी हे निवेदन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले आहे.