काळ्या बाजारात धान्य घेऊन जाणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:18+5:302021-02-09T04:24:18+5:30

शेवगाव : तालुक्यातील अमरापूर येथे एक ट्रक शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला जात असताना सोमवारी दुपारी पकडले आहे. ग्रामस्थांच्या ...

Caught the tempo carrying grain on the black market | काळ्या बाजारात धान्य घेऊन जाणारा टेम्पो पकडला

काळ्या बाजारात धान्य घेऊन जाणारा टेम्पो पकडला

शेवगाव : तालुक्यातील अमरापूर येथे एक ट्रक शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला जात असताना सोमवारी दुपारी पकडले आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने हे धान्य पकडले गेले. प्रभारी पुरवठा निरीक्षक यांनी याचा पंचनामा केला आहे. ६० गोण्या तांदूळ व १०० गोण्या गहू असे ८० क्विंटल शासकीय धान्य जप्त करण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ टेम्पो (क्र. एमएच १६ -एई ३३४५) मधून काळ्या बाजारात विक्रीला चालला होता. अमरापूरजवळील पाण्याच्या टाकीपुढे रस्त्यावर हा टेम्पो उभा होता. त्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयास माहिती दिली. त्यानंतर नायब तहसीलदार व्ही.के. जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक एस. एम. चिंतामणी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या धान्याचा पंचनामा केला. हे धान्य शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे केसभट वस्तीतील असणाऱ्या खासगी पटांगणातून भरण्यात आले. कुठे खाली करायचे हे अमरापूर येथे सांगण्यात येईल, अशी सूचना दिल्याचा जबाब ट्रकचालक प्रल्हाद दिनकर पवार (रा. नवगन राजुरी, ता. जि. बीड) याने दिला आहे. या ट्रक चालकाकडे कुठलेही परमिट व वाहतूक मार्ग नव्हता. हा ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला असून उशिरापर्यंत कारवाई चालू होती.

----

चौकशीनंतर कारवाई..

धान्य पोलीस ठाण्यात जमा करून जबाब घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीअंती आपण त्यावर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.

फोटो : ०८ शेवगाव ट्रक

अमरापूर येथे धान्यासह ग्रामस्थांनी पकडलेला ट्रक.

Web Title: Caught the tempo carrying grain on the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.