दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले; ९ जणांविरोधात गुन्हा
By शेखर पानसरे | Published: May 18, 2024 02:54 PM2024-05-18T14:54:03+5:302024-05-18T14:54:09+5:30
ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) रात्री ११.५७ वाजेच्या सुमारास पानोडी-वरंवडी घाटात करण्यात आली.
आश्वी : आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ क्रमाकांवर एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले. यात एका अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) रात्री ११.५७ वाजेच्या सुमारास पानोडी-वरंवडी घाटात करण्यात आली.
आकाश सुनील पाळंदे, रोहित भीरु मुळेकर, (दोघेही रा. दाढ बुद्रूक, ता. राहाता) आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना पोलिसांनी पकडले. सिद्धू मकवाने (रा. दाढ बु्द्रकू, ता. राहाता, पूर्ण नाव माहीत नाही), कादीर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, पूर्ण नाव माहीत नाही), शरद उर्फ गोट्या हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व इतर तीन अज्ञात इसम अशा एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात सहायक फौजदार बाबासाहेब भिकाजी पाटोळे (वय ५६, आश्वी पोलिस ठाणे, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संजय सोनवणे अधिक तपास करीत आहेत.