पारनेर तालुक्यात शिवज्योत आणून शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:58 AM2021-02-20T04:58:32+5:302021-02-20T04:58:32+5:30
पारनेर : शिवनेरी किल्ल्याहून शिवज्योत आणून पारनेर तालुक्यातील शिवभक्तांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. गुरुवारी रात्री पारनेर शहरातील पारनेर तालुका ...
पारनेर : शिवनेरी किल्ल्याहून शिवज्योत आणून पारनेर तालुक्यातील शिवभक्तांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
गुरुवारी रात्री पारनेर शहरातील पारनेर तालुका शिवजयंती महोत्सव समितीचे संतोष भोर, अनिकेत औटी, रोहन औटी, धीरज महांडुळे, सिद्धांत देशमाने, परेश होनराव, प्रणव तोटे, ओंकार पतके, आशुतोष रेपाळे, निखिल पठारे, शिवम गंधाडे, बालम पठाण, विकास थोरात, दिग्विजय लंके, दुर्गेश गंधाडे, आदित्य पुजारी, संकेत पुजारी, आनंद ठोंबरे, रोहीत ठुबे, सागर कावरे, विनोद गोळे आदी शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरीकडे रवाना झाले. शुक्रवारी सकाळी शिवज्याेत घेऊन पारनेरमध्ये आले. शिवज्योतीचे अळकुटी येथे डॉ. भास्कर शिरोळे, पारनेर शहरात वरची वेस येथे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अविनाश औटी, गणेश कावरे, उदय शेरकर, प्रमोद गोळे, आश्विन कोल्हे, दादा शेटे, सतीश म्हस्के यांनी स्वागत केले. शहरातून शिवज्योतची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कमल देशमाने व कुटुंबाने सर्व युवकांचे औक्षण केले. मुख्य वेसमध्ये आमदार निलेश लंके, उदय शेळके, दिनेश औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, नंदकुमार देशमुख, विजय डोळ, विलास मते, शैलेश औटी, बाळासाहेब मते, बाळासाहेब नगरे, सचिन नगरे, महेश ठुबे, शेखर हांडे, श्रीकांत चौरे, डॉ. सादिक राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
पारनेर शहरात भूषण शेलार व शिवजयंती उत्सव समिती, कण्हेर ओहोळ मित्रमंडळ यांनी शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी केली. पारनेर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती महोत्सवनिमित्त संभाजी ब्रिगेडचे प्रदीप साळुंखे, विद्याधर औटी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी संभाजी औटी, डॉ. आर. जी. सय्यद, मुजाहिद सय्यद आदी उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील सुपा, हंगा, मुंगशी, वडझिरे, अळकुटी, वडनेर हवेली, लोणी हवेली, जामगाव, डिकसळ, पानोली, राळेगणसिद्धी येथील युवकांनी शिवज्योत आणून शिवजयंती साजरी केली.
---
१९ पारनेर जयंती
पारनेर तालुका शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवनेरीहून शिवज्योत आणण्यात आली. तिचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.