पानोडी येथे जागतिक जलदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:38+5:302021-03-29T04:14:38+5:30

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलतर्फे गेल्या सहा वर्षांपासून पाणी बचतीवर विविध ...

Celebrate World Fast Day at Panodi | पानोडी येथे जागतिक जलदिन साजरा

पानोडी येथे जागतिक जलदिन साजरा

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलतर्फे गेल्या सहा वर्षांपासून पाणी बचतीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. यंदाही शाळेत नुकताच जागितक जलदिन साजरा करण्यात आला. शाळेने जस्ट थाॅट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शाळेमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग युनिट सुरू केले आहे. शाळेच्या छतावरील सर्व पाणी पाइपद्वारे एकत्रित करून ते पाणी फिल्टर करून ५० हजार लिटर क्षमतेच्या टाकीत साठवून ते विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, टाॅयलेटसाठी, शाळेच्या आवारातील वृक्षांसाठी वापरले जाते. विद्यार्थी अतिशय काटकसरीने या पाण्याचा उपयोग करीत आहे.

याकामी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे, दीपाली जाधव, राजश्री बोऱ्हाडे, सुचिता बालोटे, सीमा आव्हाड, कावेरी गांजवे, वंदना घोडेकर, अश्विनी बिडवे, स्नेहल अनाप, अनिता संत हे परिश्रम घेत आहेत.

..

२८आश्वी जलदिन

...

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलमध्ये जलदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक.

Web Title: Celebrate World Fast Day at Panodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.