माजी सैनिकाच्या मुलाखतीने स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:42+5:302021-08-20T04:26:42+5:30
अहमदनगर : तुम्हाला सैन्यात भरती का व्हावसं वाटलं? सुरुवातीला तुमची नेमणूक कुठे झाली? तुमच्या नोकरीतला एखादा रोमांचक प्रसंग सांगा. ...
अहमदनगर : तुम्हाला सैन्यात भरती का व्हावसं वाटलं? सुरुवातीला तुमची नेमणूक कुठे झाली? तुमच्या नोकरीतला एखादा रोमांचक प्रसंग सांगा. मुलींनी स्वसंरक्षणासाठी काय केले पाहिजे? तुमची एकूण देशसेवा किती झाली? आम्हा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? असे एक ना अनेक प्रश्न विचारून जिल्हा परिषद शाळा दत्तनगरच्या (ता. नगर) चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माजी सैनिक निवृत्ती गवळी यांची मुलाखत घेतली.
स्वातंत्र्यदिनी दत्तनगर शाळेत पालक व शिक्षक यांच्या मोजक्याच उपस्थितीत झेंडावंदन पार पडले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाईन भाषणे झाली. वर्गशिक्षिका ज्योती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांनी माजी सैनिक गवळी यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. चिमुकल्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना गवळी मेजर यांना भूतकाळातील सीमेवरील दिवस आठवले. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या आठवणी त्यांनी जागविल्या.