२५ भाविकांच्या उपस्थितीत सुरेगावला आनंदाश्रम स्वामी समाधी सोहळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:54 AM2020-06-19T11:54:47+5:302020-06-19T11:55:36+5:30
सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील आनंदाश्रम स्वामींचा समाधी सोहळा कोरोनामुळे २५ भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ जूनपासून दररोज केवळ एकाच भाविकाला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसविण्यात आला होते.
विसापूर : सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील आनंदाश्रम स्वामींचा समाधी सोहळा कोरोनामुळे २५ भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ जूनपासून दररोज केवळ एकाच भाविकाला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसविण्यात आला होते.
दत्तात्रय महाराज झरेकर यांनी सात दिवस ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले. १७ जून रोजी २५ भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळून मंदिरात आनंदाश्रम स्वामींचा जागर व भजन केले. सायंकाळी या भाविकांनी गावातून आनंदाश्रम स्वामींच्या पालखीची हरिनामाचे जयघोषात ग्राम प्रदक्षिणा घातली. सायंकाळी स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांनी प्रवचन केले.
१८ जून रोजी सकाळी ५० लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिगचा वापर करून सप्ताह व समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली. उपस्थिती मोजक्या भाविकांचे समोर काल्याच्या कीर्तनातून नामदेव महाराज पवार यांनी आनंदाश्रम स्वामींचा महीमा सांगितला.
यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व संस्थानच्या कर्मचाºयांना कपड्यांचे वाटप मनमोहनसिंग कोचर व संस्थान समितीच्या वतीने करण्यात आले. मठात सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी आनंदाश्रम स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर, कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंंकुश रोडे, दत्तात्रय महाराज झरेकर, दिलीप काका कुलकर्णी, पत्रकार नानासाहेब जठार, संतोष शिंदे, अर्जुन दारकुंडे उपस्थित होते.