भुईकोट किल्ल्यामध्ये शौर्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:38 AM2021-03-13T04:38:23+5:302021-03-13T04:38:23+5:30

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला ...

Celebration of Valor Day at Bhuikot Fort | भुईकोट किल्ल्यामध्ये शौर्य दिन साजरा

भुईकोट किल्ल्यामध्ये शौर्य दिन साजरा

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या प्रतिमेस सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर यांच्या हस्ते शौर्य दिन साजरा करण्यात आला.

११ मार्च १७९५ रोजी खर्डा येथे मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईत सर्व मराठा सरदारांनी एकत्र येत निजामाचा दारूण पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ शौर्य दिन आयोजित केला गेला.

इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय जवळेकर यांनी खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.

यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक खटावकर, खर्डा विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ज्ञानेश्वर इंगोले, दत्तराज पवार, दत्तात्रय भोसले, सुनील साळुंखे, अवि सुरवसे, प्रदीप ढगे, सूरज लोखंडे, प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव, प्रा. नकुल खवले आदी उपस्थित होते.

Web Title: Celebration of Valor Day at Bhuikot Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.