केंद्र शिष्यवृत्तीचा घोळ
By Admin | Published: September 12, 2014 11:00 PM2014-09-12T23:00:48+5:302024-03-18T18:07:39+5:30
पारनेर : केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅन लाईन अर्ज भरण्यास अवघे पाचच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
पारनेर : महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ओ.बी.सी. व अन्य जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅन लाईन अर्ज भरण्यास अवघे पाचच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
सध्या प्रथम वर्षापासून पदवी व पदविकापर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या ओ.बी.सी. व अनुसुचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावे लागत आहे. त्यासाठी नोटरी, नॉनक्रिमीलेअर, जातीचा दाखला आदी दाखले जोडून आॅन लाईन पाठवायचे आहेत. या सर्व प्रक्रियेला पाचच दिवसांची मुदत दिल्याने विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठी हाल होत आहेत.
सेतू केंद्रातून नॉन क्रिमीलेअर दाखले मिळविण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतात. अनेक विद्यार्थ्यांचे या नॉनक्रिमीलेअर दाखल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास उशीर होणार असल्याने संबंधित विभागांनी आॅन लाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी पारनेर तालुका विद्यार्थी समितीचे अध्यक्ष गणेश कावरे (पारनेर), आशिष कोल्हे, रोहित वरखडे, ज्ञानेश्वर काळे, मनोज साठे (निघोज) यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)