केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:38 PM2018-02-02T18:38:56+5:302018-02-02T18:39:25+5:30

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Central budget figures - Prakash Ambedkar | केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

कोपरगाव : केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.
कोपरगाव येथे संविधान बचाव रॅलीनिमित्त आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप सरकारने गॅस सबसिडीच्या ४० हजार कोटी रुपयांचे काय केले? याचा हिशेब नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात दोषींना जामीन मिळत असेल, तर २०१९ ला भाजपचे काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही़ अर्थसंकल्पात कधीही भाववाढ नसते. शेतक-यांना दीडपट भाव वाढवून दिला. पण शेतीमूल्यात ती रक्कम प्रतिवर्धित झालेली नाही. आजची स्थिती आटोक्याबाहेर जाणारी आहे. बाजार एकत्रिकरणाची सोय सरकारने कोलमडून टाकली आहे. त्यामुळे पुन्हा महागाईचा भडका उडेल. नाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प वास्तवात येणारा नाही. अनियंत्रित संघटना या देशाचे भविष्य ठरवायला लागल्या आहेत. काँग्रेस व भाजप हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली.

Web Title: Central budget figures - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.