शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:29+5:302021-02-07T04:19:29+5:30

शेवगाव : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, ...

Chakkajam agitation of CPI (M) at Shevgaon | शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन

शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन

शेवगाव : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटनांच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

संजय नांगरे म्हणाले की, केंद्र सरकारने चारही शेतकरी आंदोलनस्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्नपदार्थ आदींचा पुरवठा बळाचा वापर करून तोडण्यात आला. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

यावेळी काॅ. बापूराव राशीनकर, प्रा. शिवाजीराव देवढे, वैभव शिंदे, संदीप इथापे, भगवान गायकवाड, कारभारी वीर, शंकर देवढे, शशिकांत कुलकर्णी, कृष्णनाथ पवार, मुरलीधर काळे, विश्वास हिवाळे, रविराज काळे, रत्नाकर मगर, सुभाष चव्हाण, अजय मगर, शुभम झिरपे, विशाल इंगळे, राहुल पगारे, दीपक मगर, शिवा मगर, मनोज मोहिते, सय्यद बाबुलाल, सुरेश मगर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे संजय लहसे, शेखर तिजोरे, विनोद मगर, राजू दुसंग, संभाजी ब्रिगेडचे

अमोल दाते, नीलेश बोरुडे, शरद जोशी, प्रहार जनशक्ती मंचाचे कल्पेश दळे, संजय नाचन, बाळासाहेब गालपाडे, शंकरराव नेमाने, शेख जुबेर आदी उपस्थित होते.

फोटो : ०६ शेवगाव आंदाेलन

शेवगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Web Title: Chakkajam agitation of CPI (M) at Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.