नगर व श्रीगोंदा तालुक्यात चक्काजाम

By Admin | Published: June 1, 2017 02:27 PM2017-06-01T14:27:07+5:302017-06-01T14:27:07+5:30

श्रीगोंदा तालुक्यातही संपाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. गावागावातील शेतकरी संपात सहभागी झाला आहे

Chakkajam in the city and Shrigonda taluka | नगर व श्रीगोंदा तालुक्यात चक्काजाम

नगर व श्रीगोंदा तालुक्यात चक्काजाम

नलाइन लोकमत नगर/श्रीगोंदा (अहमदनगर)दि.१श्रीगोंदा तालुक्यातही संपाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. गावागावातील शेतकरी संपात सहभागी झाला आहे. डेअरी दूध संकलन करण्यात आले नाही. नगर तालुक्यातील सर्वच गावांतील शेतक-यांनी संपात सहभाग. साकत खुर्द, वाळकी, देऊळगाव, अरणगाव, गुंडेगाव, अकोळनेर, रुई छ्तीशी, मेहेकरी, निंबळक, पारगाव- भातोडी आदी ठिकाणी शेतक-यांनी आंदोलन करून संपात सहभाग घेत दूध ओतून सरकारचा निषेध केला. दौंड, सोलापूर राज्यमार्गावर शेतक-यांचा आंदोलन करून चक्काजाम केला. बाबुर्डी बेंद येथे पाच तास रास्ता रोको. खातगाव टाकळी येथे शेतकरी संपात शिवसेना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुध रस्त्यावर ओतले. कापूरवाडी येथे नगर शहरात जाणारे दुध व अन्य शेतीमाल रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. बाबुर्डी बेंद येथेही भाजीपाला व दुध रस्त्यावर ओतण्यात आले. यावेळी बाळासाहेब हराळ, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आंदोलनात सहभागी झाले होते. नगर-दौंड राज्यमार्ग पाच तास रोखून धरण्यात आला. नगर बाजार समितीत ८० टक्के आवक घटली. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे आज कांद्याचा लिलाव सुरळीत झाला पण आवक फक्त २० टक्के होती. संपामुळे ८० टक्के आवक घटली.

Web Title: Chakkajam in the city and Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.