जिल्ह्यातील खरिपात घट होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:59 PM2019-06-13T12:59:21+5:302019-06-13T13:00:47+5:30
१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात.
गोरख देवकर
अहमदनगर : १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. उशिरा का होईना कर्नाटकच्या किनाऱ्यावर आलेला मान्सून ‘वायू’ वादळामुळे पुन्हा रेंगाळला आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसह बियाणे, खते यांचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट पुन्हा गडद झाले आहे.
भीषण दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा तरी २४ ते २५ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळ, वाºयाने झालेले नुकसानच अधिक अशी अवस्था आहे. हा पाऊस अल्प दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांची बाजरीला सर्वाधिक पसंती असते. याशिवाय शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा परिसरात कपाशीची लागवड प्रामुख्याने केली जाते. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद लागवड होते.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. पारनेर तालुक्यात वाटाणा, मूग लागवड सर्वाधिक होते. जिल्ह्यात नियमित खरिपाचे क्षेत्र ४ लाख
७८ हजार ६३८ हेक्टर असते. यंदा २०१९ मध्ये खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर आहे. त्यासाठीचे बियाणे, खतांचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, वाटाणा, कपाशी पिकांच्या पेºयामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पेरणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना मार्गदर्शन
राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांची लागवड, रोग, त्यावरील उपाययोजनांबाबत ‘रोहिणी नक्षत्र पंधरवाडा’ उपक्रम राबविण्यात आला. ५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.
च्यावेळी मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंड अळी, उसावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली.
दीड लाख मेट्रिक टन खते
च्खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख २ हजार ४५१ मेट्रिक टन खतांची कृषी विभागाने मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८६० मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. यामध्ये युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना ३६ हजार ५५५ क्विंटलचा पुरवठा झाला आहे.
कपाशीची ३ लाख ३४ हजार ८२२ पाकिटे
जिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७५ हजार ९२९ कपाशी बियाणे पाकिटाची नोंद केली होती. त्यानुसार ३ लाख ३४ हजार ८२२ बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत.