नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 04:37 PM2019-08-04T16:37:32+5:302019-08-04T16:38:09+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (४ आॅगस्ट) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली.
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रविवारी (४ आॅगस्ट) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही पाचवी घटना आहे.
सिन्नर ते खेड असे चौपदीकरण करताना चंदनापुरी घाटात डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. डोंगर फोडण्यासाठी सुरूंगाचा वापर झाल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी झिरपल्याने मोठे दगड सुट्टे होवून सुरक्षा जाळ्यांमध्ये अडकले होते. या जाळ्यांवर ताण येवून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर १२ जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास जाळ्यांसह दरड कोसळली होती. ही दरड हटविण्यात आली आहे. मात्र २३ दिवसांपासून काही अंतरावर हा रस्ता बंदच आहे. आज पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.