चंदुकाका ज्वेलर्सची ‘चलो दुबई’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:07+5:302021-09-03T04:22:07+5:30
अहमदनगर : सावेडी येथील चंदुकाका ज्वेलर्सने यंदाही ‘चलो दुबई ’ ही योजना ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. या योजनेला ग्राहकांचा ...
अहमदनगर : सावेडी येथील चंदुकाका ज्वेलर्सने यंदाही ‘चलो दुबई ’ ही योजना ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत २० हजार रुपयांच्या सुवर्ण खरेदीवर एक स्क्रॅच कार्ड मिळणार आहे. त्याद्वारे ग्राहकांना दुबई ट्रिप, टॅब, डिनरसेट, स्टिम कुकर, ट्रॉव्हल बॅग, फॅन, टोस्टर, इस्त्री आणि इतरही अनेक आकर्षक गिफ्ट बॉक्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच शोरुमने खास सुवर्ण समृद्धी योजनेद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधी दिली आहे. सुवर्ण समृद्धी योजनेवर ही दुबई ट्रीप बरोबरच इतरही बक्षिसे जिंकता येणार आहेत. मात्र सदर योजना ही नव्याने ३ हजार रुपये मासिक गुंतवणूक करणाऱ्या सभासदांसाठी असेल, अशी माहिती व्यवस्थापकांनी दिली. २० हजार रुपयांची सुवर्ण खरेदी केल्यानंतर हमखास भेटवस्तू मिळणार आहे. याशिवाय दुबई ट्रीप जिंकण्याची संधी असणार आहे. खास गणपती व महालक्ष्मी साठी खास चांदीचे मोदक, ताट, वाटी, घंटी, हार, बाजूबंद, चमचे, फुलपात्र, मुकुट यासारख्या अनेक व्हरायटी मिळणार आहेत. सुवर्ण खरेदी केलेल्या दागिन्यांची मोड करतेवेळी कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. ग्राहकांनी सावेडी येथील दालनात खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वा. प्र.)