माध्यमिक सोसायटीच्या अध्यक्षपदी चांगदेव खेमनर
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:41+5:302020-12-08T04:17:41+5:30
केडगाव : जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या अध्यक्षपदी चांगदेव खेमनर यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक हरीश कांबळे ...
केडगाव : जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या अध्यक्षपदी चांगदेव खेमनर यांची निवड करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक हरीश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नगर येथे बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी अध्यक्ष काकासाहेब घुले, ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, सूर्यकांत डावखर, धनंजय मस्के, सुरेश मिसाळ, अशोक ठुबे, संजय कोळसे, सत्यवान थोरे, अनिल गायकर, कैलास राहणे, अण्णासाहेब ढगे, धोंडीबा राक्षे, आशा कराळे, मनीषा म्हस्के, दिलीप काटे, अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, पुंडलिक बोठे, दिलावर फकीर, सचिव स्वप्नील इथापे आदी उपस्थित होते.
सभासदांचा दिवसेंदिवस संस्थेवर विश्वास दृढ होत चालला आहे. माध्यमिक सोसायटी आता स्वयंपूर्ण झाली आहे. येत्या काळात कर्जमर्यादेत आणखी वाढ करण्याबरोबरच कर्जाचा व्याजदर आणखी कमी करण्यास प्राधान्य राहील, असे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले.
चांगदेव खेमनर म्हणाले, संस्थेचा कारभार आजपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन चालवला आहे. ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील. पुरोगामी सहकार मंडळाने व आमचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी निश्चितपणे यशस्वीरीत्या पार पाडील.
यावेळी पिंपळगाव लांडगा येथील शहीद जवान राजेंद्र लांडगे यांच्या वारस विमल लांडगे यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
फोटो : ०७ शिक्षक सोसायटी
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी चांगदेव खेमनर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.