राज्यात सत्ता परिवर्तन करा

By Admin | Published: October 5, 2014 11:54 PM2014-10-05T23:54:50+5:302014-10-05T23:57:58+5:30

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

Change the state power | राज्यात सत्ता परिवर्तन करा

राज्यात सत्ता परिवर्तन करा

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. आघाडी सरकारने सिंचनामध्ये केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले असते तर याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोनं पिकवलं असते, असेही त्या म्हणाल्या.
नेवासा व मिरजगाव येथील भाजपाच्या प्रचार सभेत स्मृती इराणी या बोलत होत्या. यावेळी स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, मोठ्या संघर्षानंतर केंद्रात परिवर्तन झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही परिवर्तन होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे.
शेतकऱ्यांच्या भूमीवरच काँग्रेस आघाडीच्या राजवटीत शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार जनता विसरली नाही. १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता वनवास भोगत आहे. १५ आॅक्टोबरला मतदान करून हा वनवास संपवा.
देशात गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारने गरिबी हटाव म्हणून देशात गरिबी वाढवण्याचे पाप केले असून, यापुढे देशातील प्रत्येक व्यक्ती सधन होण्यासाठी ‘जन-धन’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहनही इराणी यांनी केले.
मिरजगाव येथील सभेत खा.दिलीप गांधी, जामखेड-कर्जत मतदारसंघाचे उमेदवार आ. राम शिंदे, आष्टी-पाटोद्याचे उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, गुलाब तनपुरे, रमेश झरकर, सुवर्णा पाचपुते, शांतीलाल कोपनर, भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते.
नेवासा येथील सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे होते. यावेळी नेवासा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे अनिल ताके, सचिन देसर्डा, अंबादास कोरडे, नवनीतभाई सुरपुरिया, बाबासाहेब खराडे, रामभाऊ खंडाळे, संदीप आलवणे, बाबा कांगुणे, नामदेव खंडागळे, भाऊसाहेब वाघ, पोपटराव जीरे, रहेमानभाई पिंजारी, अ‍ॅड. विश्वास काळे, बाळासाहेब कुलकर्णी, महिला आघाडीच्या यमुनाताई रेळकर आदी उपस्थित होते. भास्कर कणगरे यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Change the state power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.