२१ व्या शतकातील बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:09+5:302021-02-12T04:19:09+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.१०) महाविद्यालयाच्या अर्घ्य अंक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.१०) महाविद्यालयाच्या अर्घ्य अंक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, अर्घ्यच्या संपादिका प्रा. सारिका शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. मालपाणी म्हणाले, जो आपले कर्म कौशल्याने करतो, तोच खरा कर्मयोगी असतो. प्रत्येकाने आपले कार्य कौशल्याने करण्यासाठी योग केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पहिले लिहायला शिकले पाहिजे, नंतर वाचायला आणि नंतर सांगायला शिकले पाहिजेे, तेव्हा ज्ञान परिपूर्ण मिळतेे. महाविद्यालयाच्या अर्घ्य अंकामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्वरचित साहित्य लिहिले आहे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.