डांगे पॅटर्न घडवतोय विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:38+5:302021-01-01T04:15:38+5:30
डांगे म्हणाले, मोबाईल, टीव्हीसारख्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुलांना तसेच खोडकर, त्रासदायक पाल्यांना व अत्यंत अभ्यासू जिगरबाज मुला-मुलींना घडविण्याची ...
डांगे म्हणाले, मोबाईल, टीव्हीसारख्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुलांना तसेच खोडकर, त्रासदायक पाल्यांना व अत्यंत अभ्यासू जिगरबाज मुला-मुलींना घडविण्याची ख्याती या स्कूलची आहे. या संकुलामार्फत महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस जिल्ह्यांतील, भारतातील आठ ते दहा राज्यांतील शिकून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पंचवीस एकरांचा विस्तीर्ण, निसर्गरम्य शैक्षणिक परिसर पाणी करून अथक परिश्रमातून अनंत अडचणींवर मात करून फुलविला आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे प्रतीक ठरलेल्या या संकुलात गेली पन्नास वर्षे गुणवत्ता राखत इयत्ता दहावी व बारावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शिस्तबद्ध, स्वच्छ, सुरक्षित कॅम्पसमध्ये सुंदरतेबरोबरच भारतीय संस्कारांचे गुरुकुल पद्धतीचे जतन करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव स्कूलची अनुभूती घेण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील सुमारे दीड हजार शैक्षणिक संस्थांच्या मॅनेजमेंटने भेटी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात डांगे पॅटर्नच्या २५ इंग्लिश मीडियम स्कूल्स व आठ ते दहा कॉलेजेस यशस्वीपणे चालत आहेत. त्यातील मुख्य शाखा नगर जिल्ह्यातील राहाता येथील प्रीतिसुधाजी स्कूल ही उपक्रमशील शाळा म्हणून महाराष्ट्रातून गौरविली जात आहे. प्राचार्य ज्ञानेश डांगे व संचालिका पूनम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली केजी ते बारावी स्टेट बोर्ड व सीबीएससी बोर्डचे विद्यार्थी घडविले जात आहेत. प्रीतिसुधाजी ज्युनिअर कॉलेजमधून दर्जेदार शिक्षणासोबतच मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण प्रक्रिया सोपी बनविण्यास प्रीतिसुधाजी स्कूल नेहमीच अग्रेसर असते. मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण माफक फी मध्ये मिळावे यासाठी प्रीतिसुधाजी स्कूलने एकरकमी फी स्कीम काढली आहे, ज्याद्वारे बालकांच्या भविष्यातील शिक्षणाची तरतूद पालकांना करता येऊ शकते.