३०  अधिका-यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:06 PM2019-01-30T12:06:35+5:302019-01-30T12:06:39+5:30

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ३० महसूल व पोलीस अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात ११ उपजिल्हाधिकारी, ...

Changes will be done by 30 officers | ३०  अधिका-यांच्या होणार बदल्या

३०  अधिका-यांच्या होणार बदल्या

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ३० महसूल व पोलीस अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात ११ उपजिल्हाधिकारी, तसेच १६ तहसीलदारांचा समावेश आहे. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले, तसेच जिल्ह्याचे रहिवासी असलेले हे अधिकारी आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महसूल अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश शासन काढणार आहे. महसूल खात्यासाठी एका पदावर तीन वर्षे व एका जिल्ह्यात चार पेक्षा अधिक वर्ष सेवा हा बदल्यांचा प्रमुख निकष आहेत. याशिवाय जिल्ह्यात मूळचे रहिवासी असणारे अधिकारी बदलीस पात्र ठरणार आहेत. महसूल, पोलीस व ग्रामविकास विभागाचे अधिकारी थेट निवडणूक कामाशी संबंधित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने बदलीपात्र अधिकाºयांची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे निकषात बसणाºया अधिकाºयांची यादी पाठवली होती. या यादीप्रमाणे बदल्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. फेब्रुवारीपासून दुष्काळाची दाहकता अधिकच वाढणार आहे. अनुभवी अधिकाºयांची बदली होणार असल्याने नव्याने बदलून येणाºया अधिकाºयांना या दुष्काळाला समोरे जावे लागणार आहे. याशिवाय ऐनवेळी येऊन लोकसभा निवडणुकीची व्यापक तयारी करणे हेही मोठे आव्हान या अधिकाºयांसमोर असणार आहे.
अशा वेळी जवळपास संपूर्ण नवी टीम घेऊन निवडणूक प्रक्रिया व दुष्काळाशी सामना करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार आहे.

संभाव्य बदलीपात्र अधिकारी
अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, उपजिल्हाधिकारी संदीप आहेर (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे (शिर्डी), उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे (संगमनेर), उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज (श्रीगोंदे-पारनेर), उपजिल्हाधिकारी वामन कदम (रोजगार हमी योजना), उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव (भूसंपादन) याशिवाय तहसीलदार मुकेश कांबळे (अकोले), साहेबराव सोनवणे (संगमनेर), किशोर कदम (कोपरगाव), माणिक आहेर (शिर्डी), सुभाष दळवी (श्रीरामपूर), अनिल दौंडे (राहुरी), सुधीर पाटील (नेवासे), विनोद भामरे (शेवगाव), किरण सावंत (कर्जत), गणेश मरकड (पारनेर), आप्पासाहेब शिंदे (नगर), जितेंद्र इंगळे, मनीषा राशीनकर, राजेंद्र थोटे, सदाशिव शेलार व हेमलता बडे, राहुल कोताडे (जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या बदलीची शक्यता आहे.

Web Title: Changes will be done by 30 officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.