सार्वजनिक शांततेचा केला भंग; सात जणांविरुध्द गुन्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:05 IST2020-07-22T14:05:17+5:302020-07-22T14:05:48+5:30
कोपरगाव शहरातील इंदिरनगर परिसरातील मावळा चौफुली येथे सार्जजनिक शांतता भंग केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२१ जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

सार्वजनिक शांततेचा केला भंग; सात जणांविरुध्द गुन्हा..
कोपरगाव : शहरातील इंदिरनगर परिसरातील मावळा चौफुली येथे सार्जजनिक शांतता भंग केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२१ जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
मावळा चौफुली येथे हे तरुण आपापसात एकमेकांना जोरजोरात शिवीगाळ, आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत होते. याप्रकरणी पोलिसांनी सचिन साळुबा राजगुरु ( वय २८), अमोल साळुबा राजगुरु ( वय ३१), युसुफ महम्मद शेख (वय ४२), बबलु शब्बीर पठाण ( वय २४), शब्बीर गुलाब पठाण ( वय ४७ ), जफर शब्बीर पठाण ( वय २६), अमन जावेद तांबोळी (वय १९, सर्व रा. मावळा चौफुली, इंदिरानगर, कोपरगाव ) या सात जणांवर रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.