पांगरमल घटनेतील २० आरोपींवर २३९६ पानांचे आरोपपत्र दाखल

By Admin | Published: May 11, 2017 05:03 PM2017-05-11T17:03:59+5:302017-05-11T17:03:59+5:30

आरोपींची संख्या आता २० वर पोहोचली आहे़ सीआयडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली़

The chargesheet filed on 20 9 Pangrammal accused accused in the case | पांगरमल घटनेतील २० आरोपींवर २३९६ पानांचे आरोपपत्र दाखल

पांगरमल घटनेतील २० आरोपींवर २३९६ पानांचे आरोपपत्र दाखल

आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ ११ - नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी (दि. ११) जिल्हा न्यायालयात २३९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़ यात २० आरोपींचा समावेश आहे़
सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून, त्यात सुरजितसिंग भगतसिंग गंभीर हा आरोपी निष्पन्न झाला आहे़ त्यामुळे आरोपींची संख्या आता २० वर पोहोचली आहे़ सीआयडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली़
पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत असलेल्या भाग्यश्री मोकाटे व मंगल आव्हाड यांच्यावतीने कार्यकर्ते व मतदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते़ या पार्टीत विषारी दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला़ ही दारू येथील जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होत असल्याचे समोर आले़ त्यानंतर विषारी दारूमुळे नेवासा तालुक्यातील १, नगर तालुक्यातील कौडगाव येथील २ तर दरेवाडी येथील दोन अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे़ या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास करून १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता़ १९ एप्रिलला तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर सुरजितसिंग गंभीर हा आणखी एक आरोपी निष्पन्न झाला़ परंतु तो अद्याप फरार आहे़ २० आरोपींपैकी गंभीर व जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे हे दोघे फरार असून, राजू बुगे या आरोपीचा अपघातात मृत्यू झाला आहे़

Web Title: The chargesheet filed on 20 9 Pangrammal accused accused in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.