रुईगव्हाण येथे कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:25+5:302021-03-04T04:38:25+5:30
कोंभळी : शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करताना जनावरांचे संगोपन चांगले करावे. त्याचबरोबर उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्यावी. पोटभर चारा व ...
कोंभळी : शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करताना जनावरांचे संगोपन चांगले करावे. त्याचबरोबर उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्यावी. पोटभर चारा व स्वच्छ पाणी दिल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहील, असे मार्गदर्शन पशू पर्यवेक्षक डॉ. पुरुषोत्तम भोस यांनी केले.
कर्जत तालुक्यातील कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत शिंदे येथील पशुवैद्यकीय केंद्राअंतर्गत रुईगव्हाण येथे पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. सरपंच रोहिणी पवार अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी उपसरपंच अश्विनी जामदार, ग्रामपंचायत सदस्या इंदरा पवार, माजी सरपंच राजेंद्र पवार, अशोक पवार, दत्ता जामदार, शिवाजी जामदार, बारकू काळे, बाळासाहेब भापकर, शिवाजी पवार, बाळासाहेब पवार, बाळू गोसावी, रंगनाथ रजपूत, डाॅ. विलास राऊत, डाॅ. संतोष पवार उपस्थित होते.