धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात डायलेसीस सेंटर सुरु करणार - सहआयुक्त शिवाजीराव कचरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:14 AM2018-06-02T11:14:20+5:302018-06-02T12:06:36+5:30
धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.
अहमदनगर : धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. अहमदनगर धर्मादाय आयुक्त कार्यालयात सामुदायिक विवाह समितीची बैठक नगरमध्ये आज संपन्न झाली. यावेळी कचरे बोलत होते. यावेळी धमार्दाय उपआयुक्त नवनाथ जगताप, उपआयुक्त हिराताई शेळके उपस्थित होते.
कचरे पुढे म्हणाले, अनेक उपक्रम धर्मादाय कार्यालयाने राबविले आहेत. यापुढेही अनेक योजना राबविल्या. आज डायलेसिसचे अनेक रुग्ण आहे. ग्रामीण भागात याची सुविधा नाही. म्हणून येत्या दोन महिन्यात डायलेसिसच्या रुग्णांसाठी काम सुरु करण्याचा मानस राज्याचे धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचा आहे. सर्व जाती व धर्म एकत्र यावेत, यासाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये राज्यात ३ हजार ४४६ लग्न लावण्यात आले. धर्मादाय संस्थाकडे अफाट ताकद आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५० हजार धर्मादाय संस्था आहेत.
धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप म्हणाले, आज गरीब लोक पाच -पन्नास हजार लग्नाला खर्च करू शकत नाही, अशी अनेक कुटूंबे आहेत. सर्वधर्मीय, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे मुलांचे, गरीबाच्या मुलींचे लग्न करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त बी. टी. येंगडे, व्ही. बी. धाडगे, अॅड. भीमराज काकडे, सतीश झिकरे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटानकार, अॅड.गौरव मिरीकर उपस्थित होते. देणगी देणारे संस्था व दानशुरां चा सत्कार करण्यात आला. धर्मादाय उप आयुक्त हिराताई शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योगेश भागवत यांनी केले तर आभार प्रकाश मोरे यांनी मानले.