‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:50 PM2019-01-23T12:50:05+5:302019-01-23T12:50:49+5:30

तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत

Cheating Cheating: 'Kaka' | ‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

कर्जत : तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत. त्यामुळे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेवाळे म्हणाले, कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायक ठरणाºया तुकाई चारीच्या मागणीला फाटा देत पालकमंत्री राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजना केली. या योजनेची संकल्पना ही पाईपद्वारे तलावात पाणी नेण्याची असल्याने लिफ्टपासून तलावात पाणी मोठ्या पाईपद्वारे जाणार असल्याने मधल्या भागातील शेतकºयांना याचा कसलाही फायदा होणार नाही. मात्र खर्च शेतकºयांच्या माथी मारला जाणार आहे. जनतेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता लाभक्षेत्रातील गावांसाठी चारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांची फसवणूक करणे थांबवावे.
कर्जत तालुक्यात अवर्षण प्रवर्ग क्षेत्रातील गुरव पिंपरी, मिरजगाव, कोंभळी, चिंचोली काळदात, टाकळी खंडेश्वरी यांच्यासह २१ गावांना वरदान ठरू शकणारी तुकाई चारी होण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. या परिसरातील बाळासाहेब सूर्यवंशी दोन वर्षांपासून तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २ हजार हेक्टरला उपयोगी ठरू शकणारी तुकाई चारी व्हावी या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत अवघ्या ५९९ हेक्टरला फक्त लाभ देणारी व पाईपलाईनद्वारे पाणी तलावात सोडणारी तुकाई उपसा सिंचन योजना जलसंधारण विभागाकडून जाहीर केली आहे.
जलसंपदा विभागामार्फत तुकाई चारी पद्धतीच्या योजना राबविणे आवश्यक असताना सिंचन योजनेसाठी जलसंधारण विभागाचा निधी वापरत जनतेची फसवणूक केली जात आहे.
तुकाई योजना ही चारीद्वारेच व्हावी अशी लाभार्थी शेतकºयांची मागणी आहे. २१ गावातील २हजार हेक्टरला त्यांचा फायदा होऊ शकणाºया चाºयांसाठी १५ कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला होता. मात्र इस्त्रायल पद्धतीची उपसा योजना करण्यासाठी ६१ कोटी रूपये देण्याची घोषणा केली गेली. या चौपट होणाºया खर्चात फक्त तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार असून त्याचा लाभ तलावाच्या आसपासच्या शेतकºयांनाच होणार आहे.
याशिवाय अवघ्या १०० दलघफू पाण्यात किती तलाव भरले जाणार आहेत? तुकाई चारीच्या नावाखाली परिसरातील लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे षडयंत्र लोकप्रतिनिधीद्वारे आखले जात आहे. या योजनेद्वारे ५९९ हेक्टर क्षेत्रास लाभ होईल हे कसे काढले? यासह यामध्ये कोणते गाव व क्षेत्र असणार आहे? याचा खुलासा अधिकाºयांना मागणार असल्याचे अ‍ॅड. शेवाळे म्हणाले.

Web Title: Cheating Cheating: 'Kaka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.