छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी काॅलेज कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:03+5:302021-06-30T04:15:03+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १७ कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०१९ ते ...
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १७ कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीतील पगार थकीत आहे. सर्व कर्मचारी गरीब कुटुंबातील असून त्यांनी प्रामाणिकपणे २००९ पासून सेवा केली आहे. पूर्ण थकीत पगार देण्यास तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेत समावेश करण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेच्या खात्यात पैसे असतानाही पगार देत नसल्याचा आरोप या निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी केला आहे. १० जुलैपर्यंत थकीत पगार अदा करून कर्मचाऱ्यांना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर ठिकाणी सामावून न घेतल्यास ११ जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महदन करणार असल्याचा इशारा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर अशोक सागर, शशिकांत म्हसे, सुनील आढाव, प्रसाद लोखंडे, ज्ञानेश्वर म्हसे, बाळासाहेब आढाव, प्रदीप वराळे, किरण शिंदे, आण्णासाहेब झांबरे, संजय हुसळे, माधव कोकाटे आदी कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
-------------
सर्व थकीत पगार करुन सर्व कर्मचाऱ्यांचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये समावेश करावा. अन्यथा आम्ही अन्यायग्रस्त कर्मचारी १० जुलै रोजी आत्मदहन करणार आहोत.
- प्रसाद लोखंडे, कर्मचारी, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राहुरी फॅक्टरी