छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी प्रस्ताव पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:46+5:302021-06-30T04:14:46+5:30
यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, कामगार नेते नागेश सावंत, राम टेकावडे, राजेंद्र पठाडे, दीपक दुग्गड, भागवत ...
यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, कामगार नेते नागेश सावंत, राम टेकावडे, राजेंद्र पठाडे, दीपक दुग्गड, भागवत लासुरे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, राजेंद्र पानसरे, राजेंद्र भोसले, शिवसेना नेते अशोक थोरे, सुधीर वायखिंडे, रमेश नवले, चरण त्रिभुवन, ‘आप’चे तिलक डुंगरवाल उपस्थित होते.
नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविणार असून त्यासाठी नेमलेल्या समितीचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. शहरातील प्रस्तावित जागेचे मोजमाप करून आर्किटेक्टकडून प्रस्ताव तयार केला जाईल.
नगरसेवक राजेंद्र पवार यांनी शहराची रामरहिम उत्सवाची परंपरा आहे. बेलापूर रस्त्यावरील वेशीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. काही मंडळी विनाकारण अफवा पसरवित आहेत, असा आरोप केला. दीपक दुगड यांनी भाजीमंडई समोरील जागेतील महावितरणचे रोहित्र इतरत्र हलविल्यास चांगला पर्याय निर्माण होईल, अशी सूचना केली. यावेळी अनिल इंगळे, भाजपचे अनिल भनगडे, किरण जऱ्हाड, किशोर ठोकळ, नितीन राऊत उपस्थित होते.