चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास मिळाले ३० बेड, इतर साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:12+5:302021-04-25T04:21:12+5:30

चिचोंडी पाटील : पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, शिवसेना नेते संदीप ...

Chichondi Patil Rural Hospital got 30 beds, other materials | चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास मिळाले ३० बेड, इतर साहित्य

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास मिळाले ३० बेड, इतर साहित्य

चिचोंडी पाटील : पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, शिवसेना नेते संदीप गुंड यांच्या प्रयत्नातून होगोनस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत चिचोंडी पाटील (ता.नगर) ग्रामीण रुग्णालयास ३० बेड, ३० गाद्या, १० ड्रम सॅनिटायझर, १००० मास्क व ५ ड्रम हँडवॉश हे साहित्य तातडीने पुरविण्यात आले.

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश नेवसे यांनी बेडची कमतरता असल्याचे सांगितले असता तातडीने हालचाली करत सभापती व उपसभापती यांनी होगोनस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. ग्रामीण रुग्णालयास बेड व साहित्य देण्याची विनंती केली. त्यानंतर कंपनीच्या मार्फत तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ही सामग्री ग्रामीण रुग्णालयास पोहोच करण्यात उपतालुका प्रमुख जिवाजी लगड, शिवसेना दशमीगव्हाण शाखाप्रमुख संतोष काळे, नानासाहेब कोकाटे, रामदास शिंदे, अशोक काळे, सचिन तोडमल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Chichondi Patil Rural Hospital got 30 beds, other materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.