मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत दाखल; अण्णा हजारे उपोषण सोडणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:00 PM2019-02-05T14:00:49+5:302019-02-05T14:48:28+5:30
लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.
अहमदनगर : लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण सोडणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले असून थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेत. दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आज अण्णा उपोषण सोडणार असल्याचे महाजन यांनी काही वेळापूर्वी सांगितले. सोमवारीही(4 फेब्रुवारी) महाजन आणि भामरे यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती.
अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
02:30 PM आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकपाल कायदा लागू व्हावा, अण्णांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी .
02:28 PM लोकपाल कायद्याचा जुना मसुदा आणि अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करण्याबाबत चर्चा सुरू.
02:41 PM शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषि मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, अण्णांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
Maharashtra CM Devendra Fadnavis, Union Agriculture Minister Radha Mohan Singh and MOS Defence Subhash Bhamre meet Anna Hazare at Ralegan Siddhi. Anna Hazare has been on an indefinite hunger strike from January 30. pic.twitter.com/t7WgFj0xcb
— ANI (@ANI) February 5, 2019
उपोषणाचा सातवा दिवस असल्याने सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी चूल बंद ठेऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जनावरेही आंदोलनस्थळी आणून बांधली आहेत.