दूधप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:28 PM2020-08-13T17:28:03+5:302020-08-13T17:28:27+5:30
दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.
अकोले : दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण देत राज्यातील दूध संघ व कंपन्यांनी दुधाचे खरेदी दर १० ते १२ रुपयाने कमी केले आहेत. विक्री दरामध्ये मात्र केवळ २ रुपयांची कपात करण्यात आली. गेले चार महिने यातून शेतकरी व ग्राहकांची कोट्यवधींची लूट केली जात आहे. शेतकरी व ग्राहकांची ही लूट थांबण्यासाठी संघर्ष समिती सातत्याने आंदोलन करीत आहे.
राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या काही घटकांचे हितसंबंध दूध व्यवसायात व शेतक-यांच्या व ग्राहकांच्या लुटीत सामावलेले असल्याने त्यांच्याकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच या प्रश्नांत लक्ष टाकण्याची आवश्यकता आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, धनंजय धोरडे, अनिल देठे, शांताराम वाळुंज, महेश नवले, डॉ.संदीप कडलग, विजय वाकचौरे, अशोक आरोटे, गुलाब डेरे, कारभारी गवळी, सुरेश नवले, खंडू वाकचौरे यांनी ही मागणी केली आहे.