मुख्याधिकारी-नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 07:24 PM2017-10-24T19:24:48+5:302017-10-24T19:36:35+5:30

शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. कारवाई रोखण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने थेट मुख्याधिका-यासह एका नगरसेवकाने आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप नगराध्यक्षांसमोर केल्याची क्लिप व्हायरल झाल्याचे पडसाद या सभेत उमटले.

The Chief-Officer- Corporators have accused of taking money | मुख्याधिकारी-नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोप

मुख्याधिकारी-नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोप

ठळक मुद्देपडसाद : श्रीरामपूर नगरपालिका सभेत गदारोळ

श्रीरामपूर : शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. कारवाई रोखण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने थेट मुख्याधिका-यासह एका नगरसेवकाने आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप नगराध्यक्षांसमोर केल्याची क्लिप व्हायरल झाल्याचे पडसाद या सभेत उमटले.
अशा प्रकारामुळे पालिकेची बदनामी होत असल्याचे म्हणत विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी याबाबत सभेत आवाज उठविला. सत्ताधा-यांनीदेखील या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
कामकाज सुरू होताच मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्या. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाचे पडसाद यावेळी पाहावयास मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी चौकात बसविणे, स्मशानभूमीतील हनुमान मंदिराच्या ट्रस्ट नोंदणीसाठी ना हरकत दाखला द्यावा, दैनंदिन कर वसुली, मुरमाची बिले काढणे, पथदिव्यांची निविदा, गोंधवणी रस्त्याचे रखडलेले काम या प्रमुख विषयांवरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली.
पालिकेने एका व्यावसायिकाचे अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणा पाठविली. मात्र, थोड्याच वेळात कारवाई थांबली गेली. हे प्रकरण नगराध्यक्षा आदिक यांच्यापर्यंत गेले. त्यावेळी मुख्याधिकारी मोरे, एक नगरसेवक व पालिकेच्या अधिकाºयांना आपण पाच लाख रुपये दिल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला. त्यानंतर शहरात सोशल मीडियावर हे प्रकरण गाजले. त्यातून पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे विरोधी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मुख्तार शाह यांनी सांगितले. सत्ताधारी नगरसेवक अंजूम शेख, राजेंद्र पवार, शामलिंग शिंदे यांनीदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. कुणा एकाचे अतिक्रमण न काढता यापुढे अतिक्रमणे होणार नाही, याची दक्षता मुख्याधिका-यांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या वादावर नगराध्यक्षा आदिक व मुख्याधिका-यांनी न बोलणेच पसंत केले.
गोंधवणी रस्त्यावर आमदार काबळे, तसेच डझनभर नगरसेवक राहतात. मात्र या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याप्रश्नी नगरसेवक शामलिंग शिंदे यांनी पोटतिडकीने रस्त्याचे काम सुरू करावे, अशी विनंती केली.
छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तयार असून, तो शिवाजी चौकातच बसविला जाईल, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सभागृहात सांगितले. मात्र, विषयपत्रिकेवर त्याचा समावेश नसल्याचा मुद्दा नगरसेवक फंड यांनी उपस्थित केला. यावर विरोधकांनी राजकारण क रू नये, पुतळा तेथेच बसविला जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. नगरसेवक अंजूम शेख यांनी सर्व नगरसेवकांची या कामास संमती असून, कायदेशीर बाबी तपासून घेण्याची सूचना केली. जेथे परवानगी मिळेल त्या ठिकाणी पुतळवा बसवावा, असे ते म्हणाले. मात्र त्यास विरोधी व सत्ताधा-यांनी आक्षेप घेत आक्रमक होऊन घोषणाबाजी केली.

Web Title: The Chief-Officer- Corporators have accused of taking money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.