मालदाड गावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:36 AM2018-03-26T11:36:27+5:302018-03-26T11:37:16+5:30
घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.
संगमनेर : कुटुंबासमवेत घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.
सीताराम कडाळे हे आपल्या कुटुंबा समवेत मालदाड गावातील खळ्या मळ्यात वास्तव्यास असून ते शेतमजूर म्हणून काम करतात. कुटुंबा समवेत ते घराबाहेर झोपले असता सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी अश्विनी हिच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या अश्विनीला घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात नेत असताना उपचारापुर्वीच तिचे निधन झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अक स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वनविभागाने मालदाड गावात पिंजरा बसविण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब नवले, माधव नवले, उत्तम नवले, विलास नवले, विपुल नवले, अजय नवले, राहुल नवले, रावबा शितोळे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.