पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक ठार; आई जखमी, श्रीगोंदा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 04:53 PM2019-10-20T16:53:50+5:302019-10-20T16:55:15+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दिवसाच्या बालकाच्या जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर घडली.
श्रीगोंदा : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दिवसाच्या बालकाच्या जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे येथील मूळचे रहिवाशी असलेले गुलाब पप्पू कोळी गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह पेडगाव येथे कोळसा बनविण्याचे काम करीत आहेत. कोळी यांच्या पत्नीने (नाव समजले नाही) दोन दिवसापूर्वी एका बाळास जन्म दिला. प्रसुतीनंतर सदर महिला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी झोपडीत होती. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झोपडीत असलेल्या बाळावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. बाळाला वाचविताना आईने कुत्र्याचा प्रतिकार केला. यावेळी आईलाही कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. याबाबत गुलाब कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.