रिमांडहोममधील मुलांना मिळाले आधारकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:24 AM2021-08-28T04:24:59+5:302021-08-28T04:24:59+5:30
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांच्या हस्ते गुरुवारी या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ...
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांच्या हस्ते गुरुवारी या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, मुलींच्या निरीक्षण गृहाच्या उपाधीक्षिका पौर्णिमा माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोले, विधी स्वयंसेवक गणेश धाकपाडे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. सुनील तोडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी न्या. देशपांडे म्हणाल्या, रिमांडहोममधील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारकार्ड अत्यावश्यक होते. मुलांच्या कल्याणासाठी ॲड. तांदळे यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. जिल्हा विधी प्राधिकरणाच्यावतीने सर्वांना न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. रिमांडहोममधील बालकांना विविध योजनांचा लाभ होत आहे. यावेळी तांदळे म्हणाल्या, मानवी तस्करीत अडकलेल्या, त्यातून सोडवणूक झालेल्या पीडित मुली व बालकांचे पुनर्वसन करताना त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने येथील बालकांना आधारकार्ड मिळण्यासाठी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व न्यायाधीश रेवती देशपांडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोळे यांनी सहकार्य केले. आता सर्व बालकांचे आधारकार्ड होणार असल्याने त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे.
------------------------------------
फोटो –२६ आधारकार्ड
रिमांडहोम मधील बालकांचे आधारकार्ड काढण्याच्या विशेष कॅम्पचे उद्घाटन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे. समवेत वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, पौर्णिमा माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोले, विधी स्वयंसेवक गणेश धाकपाडे, ॲड. अनुराधा येवले, आदी उपस्थित होते.