चीनमुळे काश्मीर अशांत-आर. के. त्रिपाठी
By Admin | Published: October 25, 2016 07:21 PM2016-10-25T19:21:51+5:302016-10-25T19:21:51+5:30
पाकिस्तान हा भारताचा उघड तर चीन हा छुपा विरोधक आहे. त्यांच्या कारवायांमुळे जम्मूू-काश्मीर मध्ये अशांत परिस्थिती आहे.
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 25 - पाकिस्तान हा भारताचा उघड तर चीन हा छुपा विरोधक आहे. त्यांच्या कारवायांमुळे जम्मूू-काश्मीर मध्ये अशांत परिस्थिती आहे. मात्र भारतीय जवान धैर्याने तोंड देत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असिस्टंट आॅफिसर आर. के. त्रिपाठी यांनी केले.
२१ आॅक्टोबर हा दिवस देशासाठी आत्मबलिदान केलेल्या शहीद जवानांना उजाळा देण्यासाठी व शहीद पोलीस स्मरण दिन पाळला जातो. यानिमित्त मुरमी (ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) येथील शहीद जवान विठ्ठल भीमराव भोसले यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील वीरगाथा कार्यक्रमात ते बोलत होते. त्रिपाठी यांनी शहीद जवान विठ्ठल भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या वीरपत्नी साखरबाई, वीरमाता कांताबाई, वीरपिता भीमराव भोसले यांचा गुणगौरव केला.
यावेळी त्रिपाठी म्हणाले, ग्रामीण भागात शाळा हे विद्यामंदिर आहे. मुरमी गाव वीरभूमी असल्याबद्दल प्रत्येक भारतीयांना अभिमान असला पाहिजे. काश्मीर भागात अशांतता व आतंकवाद असल्याने भारतीय सैन्याच्या फौजा तैनात आहेत. वीर जवान विठ्ठल भोसले यांच्या कुटुंबाला अडचणीत शासन मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.